महाराष्ट्र शासन | रायगड जिल्हा परिषद | पंचायत समिती मुरुड

सरपंच संदेश

rajashree misal
rajashree misal

कोर्लई ग्रामपंचायतच्या माझ्या सर्व आदरणीय नागरिक बंधू-भगिनींना, वडीलधाऱ्यांना आणि युवा मित्रांना नमस्कार! .

राजश्री प्रशांत मिसाळ

आपण माझ्यावर जो विश्वास दाखवून या ऐतिहासिक आणि सुंदर कोर्लई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जबाबदारी सोपवली आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले मनःपूर्वक आभार मानते. ही माझ्यासाठी केवळ एक जबाबदारी नाही, तर आपल्या गावाच्या विकासासाठी समर्पित भावनेने काम करण्याची एक संधी आहे. गावाचा विकास एकट्या ग्रामपंचायतीच्या हातून होणार नाही. यासाठी मला प्रत्येक ग्रामस्थाच्या सक्रिय सहकार्याची आवश्यकता आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की, कृपया आपले विचार, सूचना आणि समस्या थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवा. गावाच्या प्रगतीसाठी आपण दिलेले योगदान हेच आमच्या कामाला खरी प्रेरणा देईल. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत ग्रामपंचायतीचे निर्णय, विकासाची कामे आणि उपलब्ध योजनांची माहिती सतत पोहोचवत राहू.

सस्नेह जय महाराष्ट्र!