महाराष्ट्र शासन | रायगड जिल्हा परिषद | पंचायत समिती मुरुड

२४ तास पाणी पुरवठा

कोर्लई ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांना २४ तास मुबलक पाणी पुरविले जाते. हा पाणीपुरवठा एकूण २ साठवण टाक्यांमधून केला जातो   या टाकीमध्ये भोईघर धरणातून जलवाहिनी मार्फत पाणी आणून या टाक्यांमध्ये साठवण करून गावाला २४ तास पाणी पुरविले जाते.

पाणीपुरवठा योजना

घनकचरा व्यवस्थापन

कोर्लई ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांतील कचरा रोजच्या रोज घंटागाडीतून संकलित केला जातो. हा कचरा ओला आणि सुका या दोन प्रकारात वर्गीकरण करून संकलित केला जातो. गावाबाहेर असलेल्या डंपिंग ग्राऊंड वर वेळोवेळी या ओल्या कचऱ्याचे विघटन करण्यात येते.  या प्रक्रियेत नागरिकांकडून स्वच्छता कर किंवा कोणत्याही स्वरूपाचा कर आकारण्यात येत नाही.

गावातील कचरा संकलन

प्लास्टीक संकलन

साळाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांचा सुका कचऱ्यातून प्लास्टिक वेगळा करण्याचे महत्वाचे काम आम्ही फौंडेशन या संस्थेचे सदस्य नियमितपणे करतात आणि काशिद येथे स्थित त्यांच्या प्लास्टिक संकलन केंद्रावर हा सर्व प्लास्टिक संकलित करून त्यांच्यामार्फत पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जातो.

प्लास्टीक संकलन/ वर्गीकरण/ पुनर्वापर

रस्ते व्यवस्थापन

कोर्लई ग्रामपंचायत हद्दीतील गावांना जोडणारे अंतर्गत मुख्य रस्ते डांबरी असून त्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना, गावांतील अंतर्गत रस्ते काँक्रीटचे करण्यात आलेले आहे. यामुळे पावसाच्या काळात गावामध्ये पाणी साचत नसल्याने चिखल होत नाही आणि पर्यायाने घरांच्या परिसरात स्वच्छता राखणे नागरिकांसाठी सोयीस्कर झाले आहे.

गावातील अंतर्गत रस्ते व परिसर

सुसज्ज स्मशानभूमी

कोर्लई ग्रामपंचायत हद्दीतील हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती या तिन्ही प्रमुख धर्मीय नागरिकांसाठी स्वतंत्र अंत्यसंस्कार सुविधा (स्मशानभूमी) उपलब्ध आहेत. धार्मिक भावना आणि विधींचे पावित्र्य जपले जावे यासाठी ग्रामपंचायत या तिन्ही स्थळांची नियमित देखभाल आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करते. या व्यवस्थेमुळे कोर्लईमध्ये धार्मिक ऐक्य आणि सामाजिक शांतता कायम टिकून राहिली आहे.

सर्व धर्मियांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी

सांडपाणी व्यवस्थापन

कोर्लई गाव आपल्या ऐतिहासिक वारशासोबतच धार्मिक एकतेच्या मजबूत धाग्यासाठी प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायत हद्दीत हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती या तिन्ही प्रमुख धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत. ही मंदिरे, चर्च आणि मशिदी कोर्लईच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. येथील नागरिकांचे सण आणि उत्सव सामूहिकपणे साजरे करण्याची परंपरा आहे. विशेषतः पोर्तुगीज क्रिओल भाषा बोलणाऱ्या ख्रिस्ती समाजाचे आणि स्थानिक हिंदू व मुस्लिम समाजाचे सहजीवन, हे कोर्लईचे मोठे वैशिष्ट्य आहे.

विविधतेतून एकता

डिजिटल शाळा

कोर्लई ग्रामपंचायत शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयावर विश्वास ठेवते. आमच्या प्राथमिक शाळेला एक आधुनिक आणि डिजिटल स्वरूप देण्यात आले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील शाळा डिजिटल करण्यात आलेल्या असून सर्व शाळांमध्ये ग्रामपंचायतीने संगणक (शिक्षणिक सॉफ्टवेअर सहित), कलर प्रिंटर, प्रॉजेक्टर, wifi कनेक्शन या सुविधा पुरविलेल्या आहेत.

सर्व शाळा डिजिटल

एल ई डी पथदिवे

गावातील सर्व अंतर्गत मुख्य रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणी जास्त प्रकाश देणारे आणि ऊर्जेची बचत करणारे led दिवे लावण्यात आलेले आहेत. या LED दिव्यांमुळे विजेचा वापर ५० टक्क्यांहून अधिक कमी झाला आहे, ज्यामुळे ग्रामपंचायतीच्या खर्चात मोठी बचत होत आहे. पुरेशा प्रकाशामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यांवर होणारे अपघात आणि असुरक्षितता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

१००% एलईडी पथदिवे

5% 10% 15%

ग्रामपंचयातीमार्फत दरवर्षी नियोजित निधीचे वाटप तथा विनियोग केला जातो. शासनाच्या निकशांप्रमाणे 5% दिव्यांग, 10% महिला बालकल्याण, 15% दलितवस्ती विकास यावर योग्य पद्धतीने निधी खर्च केला जातो. विशेष म्हणजे लाभार्थ्यांच्या  मागणीप्रमाणे त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंचा लाभ त्यांना दिला जातो.

दिव्यांग, महिला बालकल्याण, दलितवस्ती विकास

आमची दूरदृष्टी आणि संभाव्य उपक्रम

आम्ही साळावच्या आजवरच्या प्रगतीचा अभिमान बाळगतो, पण आमची खरी नजर उद्याच्या साळाववर आहे साळावच्या भविष्याचा नकाशा तयार करण्यासाठी आम्हाला तुमच्या कल्पना आणि सूचनांची गरज आहे. आपल्या ग्रामपंचायतीचे भविष्यातील संभावित अभिनव उपक्रम पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा