महाराष्ट्र शासन | रायगड जिल्हा परिषद | पंचायत समिती मुरुड

अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे...

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्याच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेले कोर्लई, हे १६ व्या शतकातील पोर्तुगीज किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेले गाव आहे. २८६४ नागरिकांची सक्रिय लोकसंख्या आणि ३ प्रभागांमधून निवडलेल्या १० सदस्य संख्येसह, कोर्लई ग्रामपंचायत पारदर्शक प्रशासनासाठी कटिबद्ध आहे. किल्ला, दीपगृह आणि समुद्रकिनारा यांमुळे कोर्लई हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. ग्रामपंचायत १५ लाखांहून अधिक कर मागणी असलेल्या गावासाठी तंत्रज्ञान आणि लोकसहभागाच्या बळावर मूलभूत सुविधा आणि विकासाची गती वाढवत आहे. कोर्लईचा ऐतिहासिक वारसा जपत, गावाला एका आधुनिक 'स्मार्ट ग्राम' म्हणून पुढे नेणे, हेच आमचे ध्येय आहे.

नोटीस बोर्ड

आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव सज्ज असणारे आपल्या ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी

ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी

कोर्लई ग्रामपंचायत: अचूक स्थान

कोर्लई ग्रामपंचायत नेमकी कुठे आहे, हे नकाशावर त्वरित शोधा. नागरिकांच्या सोयीसाठी, येथे आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाचे अचूक स्थान (Accurate Location) दर्शवले आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा तक्रारीसाठी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी या नकाशाचा वापर करा. खालील नकाशा कार्यालयात येण्यासाठी तुम्हाला अचूक मार्गदर्शन करेल.

आपल्या सूचना, आमचा प्रतिसाद !

ग्राम पंचयातीच्या कामकाजाबद्दल आपल्या मनात काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास, गावातील विकासाच्या बाबतीत काही समस्या किंवा काही सूचना असल्यास आम्हाला हा फॉर्म भरून आपले म्हणणे कळवा. आपल्या तक्रारीची किंवा सुचनेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयामार्फत खात्रीपूर्वक घेतली जाईल.